नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालय, नवी दिल्ली (नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, न्यू दिल्ली)
नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालय हे नवी दिल्ली परिसरात असलेले एक
संग्रहालय आणि ग्रंथालय आहे. भारतीय स्वंतंत्रता संग्रामाच्या आठवणींना
उजाळा देण्याच्या आणि त्या सदैव जागृत ठेवण्याच्या उद्देशाने या
संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. येथील तीन मूर्ती भवन प्रांगणात हे
संग्रहालय आहे. १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर
त्यांच्या स्मरणार्थ हे संग्रहालय उभारले गेले. भारत सरकारच्या सांस्कृतिक
मंत्रालयांतर्गत असलेली ही एक स्वायत्त संस्था आहे. संग्र्हलायाबरोबरच
याठिकाणी आधुनिक भारताशी संबंधित विषयांवरील पुस्तकांचे ग्रंथालय आहे.
शिवाय अध्ययन केंद्र आणि नेहरू तारामंडल ही आहे.
Comments
Post a Comment