बौद्ध गया संग्रहालय, पाटणा (बौद्ध गया म्युझियम, पटना)

बौद्ध गया हे संग्रहालय बिहारची राजधानी पाटणा येथे स्थित आहे. १९१७ मध्ये इंग्रजांच्या शासनकाळात या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली. पाटणा आणि परिसरातील ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाच्या उद्देशाने हे निर्माण केले गेले. येथील स्थानिक लोक यास ‘जादू घर’ नावाने संबोधतात. मुघल आणि राजपूत यांच्या शैलीत निर्माण झालेल्या या संग्रहालयाला बिहारच्या बौद्धिक समृद्धीचे प्रतिक मानले जाते. केंद्रस्थानी आकर्षक छत्री, चारही कोपऱ्यात झरोख्यांच्या खिडक्या अशी काही या संग्रहालयाची खास वैशिष्ट्ये आहेत.

Comments