व्हिक्टोरिया स्मारक, कोलकाता (व्हिक्टोरिया मेमोरिअल, कोलकाता)

व्हिक्टोरिया  स्मारक (व्हिक्टोरिया मेमोरिअल) हे भारतातील कोलकाता शहरातील एक स्मारक आहे. १९०६ ते १९२१ दरम्यान उभारण्यात आलेले हे स्मारक राणी व्हिक्टोरियाला समर्पित आहे. भारतातील प्राचीन शिल्पकलेचे उत्तम मिश्रण याठिकाणी पाहायला मिळते. या स्मारकामध्ये एक संग्रहालय आहे, जिथे राणी व्हिक्टोरियाच्या स्टडी डेस्क, पियानो यांसह इतर तीन हजारांहून अधिक वस्तू प्रदर्शनात आहेत.

Comments