राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय, नवी दिल्ली (नॅशनल आर्ट गॅलरी, न्यू दिल्ली)

नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटजवळ असलेले राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय हे एक अद्भुत संग्रहालय आहे. १९४९ मध्ये कोलकाता येथे झालेल्या कला संमेलनात असे एखादे संग्रहालय असावे यावर विचार करण्यात आला. त्यानुसार २९ मार्च १९५४ मध्ये जयपूर हाऊसमध्ये याची स्थापना करण्यात आली. या संग्रहालयात १६ हजारांहून अधिक कलाकृती समाविष्ट आहेत. मागील १५० वर्षांमधील सांस्कृतिक आणि समकालीन ललितकलेचे हे एक खूप मोठे भांडार समजले जाते.

दिल्लीव्यतिरिक्त मुंबई आणि बेंगलोर याठिकाणी या संग्रहालयाच्या शाखा आहेत. १८५७ पासून सुरू करण्यात आलेल्या या संग्रहालयातील दृश्य आणि शिल्प कलांमध्ये वेळोवेळी बदल करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या संग्रहालयामार्फत केले जाते.

Comments