सालारजंग संग्रहालय, हैद्राबाद (सालारजंग म्युझियम, हैद्राबाद)
सालारजंग संग्रहालय हे भारताच्या हैदराबाद शहरातील एक प्रसिद्ध
कलासंग्रहालय आहे. अनेक निजामकालीन ऐतिहासिक व दुर्मिळ वस्तू या प्रदर्शनात
पाहायला मिळतात. सालारजंग हे भारतातील तिसरे मोठे संग्रहालय असून केवळ एका
व्यक्तीने जमवलेल्या वस्तूंपासून तयार झालेले हे जगातील सर्वात मोठे
संग्रहालय आहे. सालारजंग संग्रहालयात अंदाजे ४३ हजार वस्तू व ५० हजार
पुस्तके आहेत.
हैद्राबादच्या सातव्या निजामाचे
पंतप्रधान नवाब मीर युसुफ अली खान सालारजंग (तिसरे) ह्यांनी ३५ वर्षे मेहनत
घेऊन या दुर्मीळ वस्तू जमवल्या आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या मिळकतीतील
मोठा हिस्सा खर्च केला आहे.
Comments
Post a Comment