जगातील महत्त्वाची संग्रहालये

पॅलेस म्युझियम, बीजिंग (१९२५)
चीनमधील या संग्रहालयात पाच हजार वर्षांपासूनच्या राजघराण्यातील विविध वस्तूंचा खजिना पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या संग्रहालयात १८ लाखांहून अधिक कलाकृती आहेत. यामध्ये राजघराण्यातील शोभेच्या वस्तू, भांडी, चित्रे यांचा समावेश आहे.
 
 

लुव्र म्युझियम, पॅरिस (१७९३) 

हे जगातील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. सात लाख ८२ हजार ९१० स्क्वेअर फुट जागेत पसरलेल्या या संग्रहालयात प्रागैतिहासिक काळापासून ते २१व्या शतकापर्यंतच्या काळातील जवळपास ३८ हजार वस्तू पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. लिओनार्दो दा व्हिन्सीने काढलेले मोनालिसाचे चित्र हे या संग्रहालयातील खास आकर्षण आहे.
 
 
 

Comments