भारतीय रेल्वे संग्रहालय, नवी दिल्ली (नॅशनल रेल म्युझियम, न्यू दिल्ली)

दिल्ली येथील चाणक्यपुरीत भारतीय रेल्वे संग्रहालयात रेल्वेचा तब्बल १४० वर्षांचा इतिहास मांडण्यात आला आहे. विविध इंजिन आणि रेल्वेच्या डब्यांसह देशातील पहिल्या रेल्वेचे मॉडेल या संग्रहालयात पाहायला मिळते. ब्रिटीश वास्तुकार एम. जी. सेटो यांनी इ.स. १९५७ मध्ये या संग्रहालयाचे बांधकाम केले. १० एकरात हे संग्रहालय आहे.

Comments